हॉर्मुझमधून गॅसवाहू जहाज गुजरातमध्ये दाखल
होर्मुझच्या सामुद्रधुनीतून द्रवरूप पेट्रोलियम वायू घेऊन येणारे ‘सिमी’ हे विशाल जहाज सुरक्षितपणे गुजरातमधील कांडला बंदरात दाखल झाले आहे. मार्शल बेटांच्या ध्वजाखाली नोंद असलेल्या या जहाजाने हॉर्मुझ सामुद्रधुनी पार करून भारतात प्रवेश केला. या जहाजामध्ये सुमारे वीस हजार टन द्रवरूप प्रोपेन आणि ब्यूटेन वायूचा साठा असल्याची…