अकरावी प्रवेशात तांत्रिक अडचणी
अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली असली तरी तांत्रिक बिघाडामुळे ही प्रक्रिया सध्या विस्कळीत झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिक्षण विभागाचे संकेतस्थळ वारंवार बंद पडत असल्याने किंवा अत्यंत संथ गतीने चालत असल्याने प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अतोनात हाल होत आहेत. यामुळे निश्चित वेळेत अर्ज कसा भरायचा,…