श्रीलंकेकडून इराणच्या नौसैनिकांचे पार्थिव दूतावासाकडे सुपूर्द
श्रीलंका सरकारने इराणच्या नौदलातील मृत्यूमुखी पडलेल्या पंचेचाळीस नौसैनिकांचे पार्थिव इराणच्या दूतावासाकडे सुपूर्द केले आहे. हे सर्व नौसैनिक इराणच्या आयआरआयएस डेना या युद्धनौकेवर कार्यरत होते. श्रीलंकेच्या किनारपट्टीजवळ समुद्रात झालेल्या भीषण हल्ल्यानंतर ही युद्धनौकेला जलसमाधी मिळाली होती. त्यानंतर श्रीलंका नौदलाने सलग शोधमोहीम राबवून हे मृतदेह समुद्राबाहेर काढले….