मुंबईत उड्डाणपुलाखाली फुलणार भाजीपाला
मुंबईत आजवर रेल्वेमार्गांच्या कडेला होणारी शेती अनेकांनी पाहिली आहे, मात्र आता शहरातील उड्डाणपुलांखालील रिकाम्या जागांमध्येही फळभाज्यांचे हिरवेगार मळे पाहायला मिळणार आहेत. मुंबई महानगरपालिकेकडून विलेपार्ले पूर्व भागात ‘शहर शेती’चा हा देशातील पहिलाच आणि अनोखा प्रयोग राबवण्यात येत असून, आगामी रविवारी महापौरांच्या हस्ते त्याचा रितसर शुभारंभ होणार…