नेपाळला भारताकडून खतांचा पुरवठा
नेपाळने भारताकडून ऐंशी हजार टन खते खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. नेपाळला शेतीसाठी आवश्यक असलेल्या खतांचा तुटवडा भासू नये, यासाठी दोन्ही देशांमधील सरकारी यंत्रणांनी या करारावर शिक्कामोर्तब केले आहे. या निर्णयामुळे नेपाळमधील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, ऐन हंगामात खतांची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे….