दौलताबाद किल्ला
महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील दौलताबाद किल्ला हे एक आश्चर्यच मानले जाते. ह्याला औरंगाबादमध्ये ‘औरंगाबाद किल्ला’ असेही म्हटले जाते. या किल्ल्याचे पहिले नाव दौलताबाद नसून ‘देवगिरी’ असे होते. महंमद बिन तुघलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी दिल्लीहून देवगिरी किल्ल्यावर स्थलांतरित केली. त्यावेळी त्याने देवगिरीचे नाव बदलून ‘दौलताबाद’…