भूकंपग्रस्त अफगाणिस्तानला भारताकडून मदत
अफगाणिस्तानमध्ये ४ एप्रिल २०२६ रोजी भूकंपाचा जोरदार तडाखा बसला होता. याशिवाय तिथे भीषण पूरही आला होता. यामुळे भारताने मानवतेच्या दृष्टीने बाधित झालेल्या अफगाणिस्तानमधील नागरिकांसाठी तातडीची मदत पाठवली आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली असून, संकटाच्या काळात अफगाण जनतेसोबत आपली एकात्मता आणि सहकार्य…