मुंबई – गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
कोकणाकडे निघालेल्या पर्यटकांच्या वाहनांमुळे मुंबई – गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. सलग सुट्ट्या आणि मुलांच्या शाळांना मिळालेली सुट्टी यामुळे मोठ्या संख्येने नागरिक आपल्या खासगी गाड्या घेऊन कोकणात दाखल होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर आणि लांजा या परिसरातील अरुंद रस्ते तसेच पुलांच्या कामामुळे वाहनांच्या…