उन्हाळ्यात रायगडमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत
रायगड जिल्ह्यातील धरणांमधील पाण्याची पातळी चिंताजनक रितीने खाली जात असून अनेक विभागांमध्ये पाणीटंचाईची लक्षणे दिसू लागली आहेत. गेल्या वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने सर्व धरणे काठोकाठ भरली होती, त्यामुळे यंदा पाणीटंचाई भासणार नाही असा अंदाज लावला जात होता. मात्र, उन्हाळ्याची चाहूल लागताच परिस्थिती झपाट्याने बदलली…