राजगडसाठी पंधरा कोटींचा विकास आराखडा
पुणे : हिंदवी स्वराज्याची पहिली राजधानी आणि ऐतिहासिक वारसा असलेल्या राजगड किल्ल्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्याच्या पुरातत्त्व विभागाने पंधरा कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे. खडकवासला परिसरातील या किल्ल्याला जागतिक वारसास्थळाचा दर्जा मिळाल्यानंतर पर्यटकांसाठी अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात आले…