लोकसभेच्या चार समित्यांची पुनर्रचना
लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी चार महत्त्वाच्या संसदीय समित्यांचे पुनर्रचना केली आहे. या समित्यांमध्ये तीन आर्थिक समित्या आणि एका स्थायी समितीचा समावेश आहे. संसदेच्या नियमांनुसार या समित्यांचा कार्यकाळ दरवर्षी तीस एप्रिल रोजी समाप्त होतो आणि त्यानंतर नवीन सदस्यांची निवड केली जाते….