घारापुरीच्या उत्खननात ऐतिहासिक ठेवा
मुंबईच्या जवळ असलेल्या जगप्रसिद्ध एलिफंटा लेण्यांच्या इतिहासाबद्दल एक अत्यंत महत्त्वपूर्ण संशोधन समोर आले आहे. पुरातत्वशास्त्रज्ञांना या बेटावर उत्खननादरम्यान प्राचीन इराणमध्ये तयार होणारी पिरोजी रंगाची चकाकी असलेली मातीची भांडी सापडली आहेत. या शोधामुळे हे सिद्ध झाले आहे की, सातव्या ते नवव्या शतकादरम्यान एलिफंटा बेटाचे इराण आणि…